अलकुड एस विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सलीम मुलाणी, व्हा.चेअरमनपदी मसाजी कांबळे बिनविरोध!

शिवाजी ओलेकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कवठेमहांकाळ:

अलकुड एस (ता.कवठेमहांकाळ) येथील विकास सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सलीम खाजेसो मुलाणी तर व्हा.चेअरमन म्हणून मसाजी साधू कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सलीम मुलानी यांना चेअरमन पदासाठी दिलीप गुरव यांनी सूचक म्हणून काम केले तर अनुमोदक म्हणून रामदास पाटील यांनी अनुमोदन दिले. मसाजी साधु कांबळे यांच्यासाठी आनंदराव चौगुले यांनी सूचक म्हणून काम केले तर रावसाहेब महाजन यांनी अनुमोदन दिले.
अगोदरचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज या नवीन निवडी करण्यात आल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.टी.गोंदकर यांनी काम पाहिले. यावेळी सचिव संजय जाधव, महांकाली कारखान्याचे व्हाईस चेअरमन दीपकराव ओलेकर ,माजी सरपंच राजाराम जानकर,खरेदी-विक्री संघाचे संचालक दिलीप गुरव,युवक नेते दिलीप ओलेकर ,माजी चेअरमन बापूसाहेब जानकर,पोलीस पाटील युवराज पाटील ,ग्रा.पं.सदस्य गणपती पाटील,ज्ञानू पाटील, बी.डी.पाटील,अनिल गोरड, चंद्रकांत मोकाशी,धनाजी कांबळे, उपस्थित होते.
यावेळी इंजिनिअर संजय पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी ओलेकर सर, रासपचे नेते सूर्यकांत ओलेकर, अतुल कांबळे ,अमोल गोरड यांनी निवडीनंतर निवासस्थानी जाऊन सत्कार केला.