रासपचे ओबीसी आरक्षणाबाबत सांगलीत आंदोलन!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:


सांगली येथे सांगली जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीने ओबीसी आरक्षणसंदर्भात आंदोलन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रभर राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य सरकारने ओबीसी (इतर मागासवर्ग) आयोगाची स्थापना करुन न्यायालयीन बाबींची पूर्ततेसाठी काम सुरू करावे,ओबीसी समाजाचा एम्पिरिकल (अनुभवातीत लिखित ) डाटा माहिती तातडीने जमा करुन न्यायालयात द्यावा,ओबीसी आरक्षण स्थगिती जोपर्यंत उठविली जात नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. शाहिद मुलाणी, उमाजी चव्हाण, लक्ष्मण सरगर, आप्पासाहेब थोरात,विशाल सरगर, कालिदास गाढवे, अखिल नागरजी, सत्यजित गलांडे, धनाजी गावडे, अरुण झंजे, पांडुरंग धडस, समाधान चौगुले, ब्रम्हदेव गायकवाड, यशवंतराव माने, आण्णासाहेब कोळेकर, विकास सरगर, समाधान घुटुकडे, दिपक पाटील, सोमनाथ शेंडगे, सुखदेव म्हारगुडे, आधी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केले.