
कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील महादेव मंदिर येथे लोकमत वृत्तपत्र समूहच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन सरपंच अमोल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.विकास मोरे,सोपान काळे, विष्णू यादव, राहुल(पिंटू) मोरे,हणमंत मोरे, मूजू तांबोळी,संजय वाघमारे आदि उपस्थित होते.
मिरज येथील अक्षय रक्त केंद्राचे बीटीओ डॉ. महादेव सरगर,तांत्रिक पर्यवेक्षक प्रकाश कन्नूरे,तंत्रज्ञ प्रियांका माने, स्टाफ सिस्टर नूतन काटे, मोहिनी माने, तंत्रज्ञ भारती पवार, लेखनिक हजरतअली पखाली यांनी रक्त संकलन केले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाचे व्यवस्थापन लोकमत समूहातर्फे दिघंचीचे लोकमत प्रतिनिधी अमोल काटे, जाहिरात विभागाचे प्रताप देशमुख, इरफान सलाती तसेच ब्लड बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन केले.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर