जिल्ह्यात १४ जणांचा कोरोनाने मृत्यू, तर ९६९ नवे पॉझिटिव्ह! ८०७ कोरोनामुक्त!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २९ जून,२०२१

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.२९ जून रोजी १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ९६९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ८०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

म्यूकरमायकोसिसचे जिल्ह्यात आतापर्यंत २८६ रुग्ण सापडले असून आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. २९ जून,२०२१

आटपाडी २२ (मृत्यू ०)
जत २० (मृत्यू १)
कडेगाव ७८ (०)
कवठेमहांकाळ १२ (०)
खानापूर ६६ (२)
मिरज १४६ (०)
पलूस ७५ (१)
शिराळा ४५ (०)
तासगाव ५९ (१)
वाळवा २५१ (६)
सांगली,मिरज महानगरपालिका १९५
(सांगली-१६४ ,मिरज-३१)
(मृत्यू: सांगली-२, मिरज-१ ,कुपवाड-०)
एकूण ९६९ (मृत्यू-१४)