जत काँग्रेसच्या वतीने ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ केंद्रातील मोदी सरकार विरोधी धरणे आंदोलन
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत काँग्रेसने जते येथे केंद्र सरकारचा निषेध करत तीव्र निदर्शने केली. जत शहरातील मुख्य बाजार पेठेतील हनुमान मंदिरासमोर आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी आ. सांवत म्हणाले की, केंद्र सरकारचा ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात आम्ही आंदोलन करत जनतेसमोर सत्य मांडण्याचे काम केले आहे. आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, कार्याध्यक्ष नाना शिंदे, निलेश बामणे, परशूराम मोरे, नाथा पाटील, अरविंद गडदे, सलीम पाच्छापूरे, सलीम नदाफ, भूपेंद्र कांबळे, गणी मुल्ला, राजु यादव, आप्पा माळी,आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन