संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस येथे स्व.शिवाजीराव पाटील कुस्ती केंद्रात बैठकीसाठी पक्ष निरक्षक गौरव झांझुर्णे ( करमाळा ) व दिंगबर सुडके ( पंढरपुर ) तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी तालुका शासकीय समितीवर नियुक्ती करण्यात येणाऱ्या नावाबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीस राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ पाटील, पांडुरंगभाऊ देशमुख,उपनगराध्यक्ष डॉ.मारुती पाटील, पंढरपुर लोणंद रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. सोमनाथ आण्णा वाघमोडे,शंकर सह साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास आप्पा सालगुडे पाटील,राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष ऋतुजाताई मोरे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष इंद्रजीत रूपनवर,युवा उद्योजक सुजयसिंह माने पाटील , ॲड.आकाश पाटील,ओबीसी तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे,राष्ट्रवादी युवती तालुका उपाध्यक्ष रूपाली मोहिते पाटील , तालुका युवती सरचिटणीस ऋतुजा रायते ,राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र गोरड, विलासराव आदरट,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सरईगुले देशमुख,राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस विशाखा भानवसे, भिमराव पांढरे, आनदराव पांढरे,राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा निशा झिंबल,राष्ट्रवादी युवक,युवती,महिला उपस्थित होत्या. स्वागत नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष डाॅ.मारूतीराव पाटील यांनी केले.आभार एन.डी.पाटील यांनी मानले

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन