जिल्ह्यात २१ जणांचा कोरोनाने मृत्यू तर १०८९ नवे पॉझिटिव्ह, ९०१ कोरोनामुक्त!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २६ जून,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.२६ जून रोजी २१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून १०८९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ९०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आज म्यूकरमायकोसिसचे नवे ५ रुग्ण सापडले आहेत.तर जिल्ह्यात आतापर्यंत २८२ रुग्ण सापडले असून आज एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. २६ जून,२०२१

आटपाडी ७१ (मृत्यू ०)
जत ३५ (मृत्यू २)
कडेगाव ८८ (२)
कवठेमहांकाळ ५७ (३)
खानापूर ८२ (०)
मिरज ८७ (१)
पलूस १२६ (०)
शिराळा ६९ (२)
तासगाव ६२ (०)
वाळवा २१६ (६)
सांगली,मिरज महानगरपालिका १९६
(सांगली-१४७ ,मिरज-४९)
(मृत्यू: सांगली-३, मिरज-१ ,कुपवाड-१)
एकूण १०८९ (मृत्यू-२१)