७० पॉझिटिव्ह,३६ कोरोनामुक्त !

*आटपाडी तालुका : कोरोनायन*  दि.२६/०६/२०२१  मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. २६ जून रोजी तालुक्यात नव्याने ७० लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,तर ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अँटीजन चाचणीद्वारे ४८ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये ३९ पुरुष असून ३१ स्त्रियांचा समावेश आहे.यापैकी आटपाडी तालुक्यातील ६७ व तालुक्याबाहेरील ३ व्यक्तींचा समावेश आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यात यश येत आहे.

आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२६ जून,२०२१)

आटपाडी 4
खरसुंडी 9
दिघंची 4
लिंगीवरे 10
पिंपरी बु. 27
मुढेवाडी 1
बनपुरी 1
हिवतड 1
गोमेवाडी 2
उंबरगाव 1
अर्जुनवाडी 1
घाणंद 2
बाळेवाडी 1
माडगुळे 1
विठलापूर 1
कानकात्रेवाडी 1
कराड 1
खवासपूर 2