प्रा.अमर वाकडे यांना पीएच.डी.पदवी प्रदान!

संजय हुलगे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस येथील समीर गांधी महाविद्यालयात भूगोल विभागात कार्यरत असलेले प्रा.अमर गोपाळ वाकडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी.ही पदवी नुकतीच संपादन केली. प्रा.अमर वाकडे यांनी डॉ.अर्जुन ननवरे भूगोल विभाग व संशोधन केंद्र, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी यांच्या मार्गदर्शनाखाली “इम्पॅक्ट ऑफ इरिगेशन ऑन अॅग्रिकल्चर प्रॉडक्टिविटी इन लोअर सीना बेसिन : ए जिऑग्राफिकल एनालिसिस ” या विषयावर पीएच.डी. शोधप्रबंध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास सादर केला होता. या प्रबंधास राज्यातंर्गत व राज्याबाहेरील परीक्षकांचा परीक्षण अहवाल विद्यापीठाने स्वीकारल्यानंतर व विद्यार्थ्याच्या खुल्या मुलाखतीचा सकारात्मक अहवाल विद्यापीठाला मिळाल्यानंतर विद्यापीठाने ही पदवी प्रा. वाकडे यांना प्रदान केली आहे. या यशाबद्दल श्री.हनुमान शिक्षण प्रसारक संस्थेचे जनरल सेक्रेटरी अॅड.मिलिंद कुलकर्णी, अध्यक्ष अॅड.माधव मिरासदार, कार्याध्यक्ष श्रीकांत पंचवाघ व सर्व संचालक,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास गेजगे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा.अमर वाकडे यांचे अभिनंदन केले.