प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवू:उपसभापती विष्णू चव्हाण

शिक्षक संघांच्या शिष्टमंडळाला दिली ग्वाही

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुक्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. ते प्रश्न  सोडवावेत,या मागणीसाठी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघांचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जत पंचायत समितीचे उपसभापती विष्णू चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी उपसभापती चव्हाण यांनी शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू,अशी ग्वाही शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली.जत तालुका प्राथमिक शिक्षक संघांचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर ,जिल्हा उपाध्यक्ष जैनुद्दीन नदाफ, शिवाजीराव सावंत, तालुका उपाध्यक्ष भगवान वाघमोडे, भालचंद्र गडदे ,रावसाहेब वाघमोडे तालुका  सरचिटणीस गुंडा मुंजे,तालुका कार्याध्यक्ष तानाजी टेंगले यांनी उपसभापती चव्हाण यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी उपसभापती चव्हाण यांचा संघांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तालुक्यातील  शिक्षकांची  सातव्या वेतन आयोग पडताळणीकामी पाठपुरावा करावा, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर जि.प. शाळा इमारत डागडुजी व शालेय परिसर स्वच्छ करून मिळाव्यात, जिल्हा  परिषदच्या सर्व शाळांना विद्युतीकरण व शाळा संरक्षण भिंत बांधावी, शालेय शौचालय, मुताऱ्या व पाण्याची सोय करावी,जिल्हा परिषदच्या सर्व दवाखान्यातील,’रुग्ण कल्याण’समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून  प्राथमिक शिक्षकांचा एक सदस्य घ्यावा, पंचायत समितीच्या मध्यामातून शाळा निर्जंतुकीकरण साहित्य (किट) शाळांना मिळव्यात अशी मागणी यावेळी शिष्टमंडळानी उपसभापती चव्हाण यांच्याकडे केली.