२२ पॉझिटिव्ह; ३४ कोरोनामुक्त!

*आटपाडी तालुका : कोरोनायन*  दि.१४/०६/२०२१ 

मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. १४ जून रोजी ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून नव्याने २२ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये १२ पुरुष असून १० स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे १० जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील २१ व तालुक्याबाहेरील कोळे येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यात यश येत आहे.

आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.१४ जून,२०२१)

आटपाडी 1
करगणी 2
खरसुंडी 3
दिघंची 1
बनपुरी 3
शेटफळे 1
पिंपरी बुद्रुक 1
कौठुळी 2
पुजारवाडी(आ) 1
पुजारवाडी(दि) 1
मापटेमळा 1
गळवेवाडी 2
लिंगीवरे 2
कोळे 1