
सांगली जिल्हा : कोरोनायन दि.१३ जून,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि. १३ जून रोजी ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.२० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने ८१२ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज म्यूकरमायकोसिसचा नवा एक रुग्ण सापडला आहे. तर आत्तापर्यंत २४० रुग्ण सापडले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात ८ हजार ९५१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर एक लाख १७ हजार ५७२ रुग्ण बरे झाले असून ३७३.८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख ३० हजार २०१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत १२२५ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर ९९२, हाय-फ्लो नेझल ऑक्सिजनवर १३ आणि व्हेंटिलेटरवर २२० रुग्ण आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. १३ जून,२०२१
आटपाडी ३० (मृत्यू ३)
जत ५० (मृत्यू २)
कडेगाव ५५ (१)
कवठेमहांकाळ ४२ (१)
खानापूर ३० (०)
मिरज ११० (५)
पलूस ८४ (१)
शिराळा ८५ (०)
तासगाव २० (३)
वाळवा १८८ (२)
सांगली,मिरज महानगरपालिका ११८
(सांगली-९४ ,मिरज-२४)
(मृत्यू: सांगली-२, मिरज-१ ,कुपवाड-०)
एकूण ८१२ (मृत्यू-२०)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर