
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत क्रांती लोकसंचलित साधन केंद्र जत मार्फत व कृषी विभागाच्या कृती संगमातून क्रांती cmrc ने अल्प दरात जत तालुक्यातील शेतकरी उत्पादक गटातील ९० महिला शेतकऱ्यांना उडीद बियाणे निर्मितीसाठी कंपनीमार्फत बियाणे दिलेत व खरेदी कंपनी स्वत: करणार आहे व गटातील महिलांना कृषी विभागामार्फत मका व तुर बियाणे वाटप करण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय सांगली स्थापित क्रांती लोकसंचलीत साधन केंद्र अंतर्गत बियाणेवाटप जतचे कृषी अधिकारी सातपुते यांचे हस्तेवाटप करण्यात आले.मनोगतामध्ये त्यांनी बिज प्रक्रिया करून बियाणे लावले तर खर्च कमी होईल,उत्पन्नात वाढ होईल.तसेच किड व्यवस्थापन कसे करावे?,पाणी व्यवस्थापन कसे करावे?, तण व्वस्थापन कसे करावे? यासंदर्भांत सर्व माहिती दिली. त्यावेळी कल्पेश उमराणीकर यांनी महिला शेतकऱ्यांनी स्वतः शेतीचे अर्थकारण समजून घेऊन शेती करावी, आपल्या उत्पन्नात वाढ कशी करावी, खर्च कमी कसा करावाल यावर मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी वेताळ यांनी महिला शेतकऱ्यांवर विश्वास दाखवत माविम संचालित जत तालुक्यात क्रांती CMRC जत यांना मका लागवडी करीता येळवी,बिळुर,अचकनहळ्ळी या गावामध्ये प्रती शेतकरी ५ किलो बियाणे दिले व बीजोत्पादन घेण्यासाठी CMRC अंतर्गत असणाऱ्या महिला शेतकरी उत्पादक गट यांना वितरित केले. या संधीचे सोने करत, नैसर्गिक आपत्तीना सामोरे जात महिलांनी विश्वासास पात्र ठरत सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन करत जत तालुक्यात यशस्वीपणे घेऊन हा काम करत आहेत. हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी कल्पेश उमराणीकर, लेखाधिकारी पवन कुलकर्णी CMRC व्यवस्थापक, लेखापाल व सहयोगिनी व सी आर पी यांनी मेहनत घेतली.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा