प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील डाळिंब व द्राक्ष बागांच्या पिकांचा विमा तातडीने देण्याची मागणी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.आटपाडी तालुक्यामध्ये डाळिंब व द्राक्ष बागांचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शासनाने विमा संरक्षित केला असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी डाळिंब व द्राक्ष बागांच्या विम्यातून मिळणारी नुकसान भरपाई मार्चअखेर मिळत होती. यावर्षी अतिवृष्टीमुळे डाळिंब व द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. अद्यापही विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. दरवर्षी साधारणपणे जुलैमध्ये नवीन हंगामाचा विम्याचा हप्ता शेतकरी भरतात. परंतु अद्याप मागील वर्षाची नुकसान भरपाई मिळाली नाही. विमा रिलायन्स कंपनी व एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी या कंपनीचे आहेत. आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तातडीने देण्यासाठी विमा कंपन्यांना आदेश करावेत, अशी मागणी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पालकमंत्री जयंतराव पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनाही याबाबत निवेदन दिले आहे.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा