२६ जणांचा मृत्यू तर १००७ नवे पॉझिटिव्ह; १४५२ कोरोनामुक्त

सांगली जिल्हा : कोरोनायन दि.१ जून,२०२१  प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.१ जून रोजी १४५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.२६ कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला असून नव्याने १००७ रुग्ण सापडले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात ११ हजार ४६२कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर एक लाख ४ हजार ४६२ रुग्ण बरे झाले असून ३४५०
 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख १९ हजार ३७४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत १७४८ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १४७६, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर ३१ आणि व्हेंटिलेटरवर २४१ रुग्ण आहेत.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. १ जून,२०२१

आटपाडी ५७ (मृत्यू १)
जत ७७ (मृत्यू ५)
कडेगाव ६० (२)
कवठेमहांकाळ ७२ (१)
खानापूर ५७ (०)
मिरज १२२ (५)
पलूस ८५ (१)
शिराळा ११५ (२)
तासगाव ८४ (५)
वाळवा १४० (३)
सांगली,मिरज महानगरपालिका १३८
(सांगली-९४ ,मिरज-४४)
(मृत्यू: सांगली-०, मिरज-० ,कुपवाड-१)
एकूण १००७ (मृत्यू-२६)