शेड्याळ ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत : 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गावातील आरोग्य कर्मचारी,आरोग्य सेवक,सेविका,आशा वर्कर्स ,अंगणवाडी सेविका आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करतात.शेड्याळ गावात 35-40 रुग्ण सापडलेले होते.त्यापैकी 32-33 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.म्हणून शेड्याळ ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट,फेसहेल्ड,N.95 मास्क,हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हे सर्व साहित्य आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले व यापुढे  गावातील कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांना व कुटुंबातील व्यक्तिंनाही मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे.यावेळी सरपंच अशोक जाधव,उपसरपंच भगवानदास केंगार,ग्रामपंचायत सदस्य  कऱ्याप्पा गुगवाड,भाऊसो जाधव,तायवा थोरात,विद्याधर जाधव,कांताबाई गुगवाड,राजाक्का हावगोंडी,कांताताई गुगवाड,ग्रामसेवक कादरखान नदाफ,तलाटी संजय कोरे,आरोग्य सेवेक चोले सर,आशा वर्कर सुनिता जाधव,अंगणवाडी सेविका अहिल्याबाई सातपुते,मिनाक्षी हावगोंडी,ग्रामपंचायत कर्मचारी बिरु जावीर,शंभुराज कसबे उपस्थित होते.