कोविशील्ड लसीचा दुसरा डोस आता 84 दिवसानंतर!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार आता कोविशील्ड लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसच्या 84 दिवसानंतर दिला जाणार आहे. पोर्टलमध्ये दि. 14 मे पासून हा डोस 84 दिवसानंतरच व्हेरिफाय होणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी केंद्रावर घाईगर्दी करणाऱ्यांनी पहिल्या डोसला 84 दिवस पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या डोससाठी केंद्रावर जाणे उचित ठरणार आहे.कोविशील्ड लसीचा पहिला डोस आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करला दिल्यानंतर पुढे तो 45 वर्षावरील व्यक्तींना देण्यात आला. त्याचबरोबर 18 ते 44 वर्षे वयोगटाचे नोंदणीकरण करून एक मेनंतर लाभ देण्याचे ठरले. परंतु आत्ताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा डोस थांबवण्यात आला.कोविशील्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी 28 ते 42 दिवसांचा कालावधी ठरवण्यात आला होता.त्यानंतर पुढे तो वाढवून 42 ते 56 दिवस करण्यात आला. त्यामुळे या काळात पूर्वीच्या डोसच्या शेडूलप्रमाणे लाभार्थ्यांना दुसऱ्या डोससाठी मोबाईलवर नोटिफिकेशन आल्या. मात्र 42 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला नसल्यामुळे त्यांना ऑनलाइन प्रणालीप्रमाणे  दुसरा डोस घेता आला नाही. 42 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय हा डोस त्यांना मिळणार नाही.त्यानंतर आता तर दिनांक 14 मे पासून हा कालावधी 42 दिवसावरून 84 दिवस करण्यात आला आहे.म्हणजे 6 ते 8 आठवड्यांऐवजी 12 ते 16 आठवडे करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर घाईगर्दी करून जाणाऱ्या लाभार्थ्यांना 84 दिवसाशिवाय दुसरा डोस मिळणार नाही. पोर्टलवरही ते व्हेरिफाय होणार नाही. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करणे योग्य ठरणार नाही.