बदलापुरच्या देवानंद पाटील या तरुणाची इस्त्रोमध्ये ज्युनियर सांयटिस्ट म्हणुन निवड
जनजागृती सेवा समितीच्यावतीने विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/बदलापुर:
खान्देश मराठा पाटील मंडळाचे उपाध्यक्ष व प्रामाणिक रिक्षा चालक सुरेश पाटील यांचे चिरंजीव देवानंद पाटील टाटा स्टील जमशेदपूर येथे इंजिनिअर म्हणुन नोकरी करत आहे. नोकरी करत असताना त्याने ब-याच परिक्षा दिल्या.त्यातीलच इस्त्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिचर्स संस्थेची परिक्षा पास होऊन देवानंद पाटील याची इस्त्रो मध्ये ज्युनियर सांयटिस्ट म्हणुन निवड झालेली आहे.बदलापुरचे नाव सातासमुद्रापार गेलेलं आहे.त्याच कौतुक करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी जाऊन “जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेकडुन समितीचे पदाधिकारी दिपक वायंगणकर,एकनाथ गायकर,तसेच मंत्रालयातील सेवा निवृत्त अधिकारी जेष्ठ सल्लागार दीलीप नारकर,सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष सुनिल दळवी,सेक्रेटरी राजेंद्र नरसाळे, टीटवाळा उद्योजक फोरमचे अध्यक्ष मानसोपचार तज्ञ,व्यसनमुक्ती आणि पेरेटींग कोच डाॅ.अमितकुमार गोविलकर,शिवसेना विभाग प्रमुख,बुलढाणा संघटक विलास हंकारे,डाॅ.निता पाटील फाऊंडेशनच्या अध्यक्षा डाॅ.निता पाटील,हिंदु महासभा महाराष्ट्र प्रदेश संघटनक सुवर्णा इस्वलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “विशेष सन्मानपत्र “देऊन सत्कार करण्यात आला. जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.शब्दांकन डाॅ.प्रल्हाद देशपांडे यांनी केले.सर्व प्रमुख पाहुण्यांनी देवानंद पाटील याच्या सन्मानार्थ त्यांच्या खडतर वाटचालीचा त्याच्या कुटुंबियांचा सहभाग संदर्भात यथोचित गौरवोद्गार काढत सिनियर सांयटिस्ट होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाठी समितीच्या सचिव संचिता भंडारी व खजिनदार दत्ता कडुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य एकनाथ गायकर यांनी केले व आभार सदस्य दीपक वांयगणकर यांनी मानले.देवानंद पाटील याच्या यशस्वी उड्डाणाबाबत सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

संबंधित बातम्या
गलाई बांधवच माणदेशाच्या आर्थिक विकासाचा कणा
तळेवाडी-आटपाडीच्या भाऊ-बहिणीची गरुडभरारी !
‘गाव लय भारी’!