
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत शहरातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.त्यामुळे प्रशासनाने जत शहरासह तालुक्यात आजपासून ते दि.१५ मे पर्यंत कडक जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री जयंतरावजी पाटील यांनी उद्यापासून संपूर्ण सांगली जिल्ह्यात आठ दिवसाचा कडक लाॅकडाऊन लावण्याचे प्रशासकीय पातळीवर नियोजन करून आदेश काढले आहेत. प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत असून प्रशासनाला सहकार्य म्हणून जत शहरवासियांनी जनता कर्फ्यु कालावधीत विनाकारण घरातून बाहेर पडणे टाळावे.आपण घरी रहा सुरक्षित रहा.या जनता कर्फ्यु कालावधीत जर विनाकारण घराचे बाहेर पडल्यास वाहन जप्त करुन जागेवर कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. यात कोरोना पाॅझीटीव्ह आढळल्यास चौदा दिवस कोविड सेंटरमध्ये रहावे लागणार असून हे सर्व टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच राहणे सुरक्षित आहे. सद्या जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पाॅझीटीव्ह रूग्ण आढळून येत आहेत.या रूग्णांना हाॅस्पीटलमध्ये ऑक्सीजन बेडची व व्हेंटीलेटरची गरज लागत आहे. ही परिस्थिती आपणावर येऊ नये असे जर आपणाला वाटत असेल तर आपण जनताकर्फ्युचे चांगल्या प्रकारे पालन केले पाहीजे व प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य केले पाहिजे. तसेच प्रशासनाने कोरोनाचे पार्श्वभूमीवर जनताकर्फ्यु कालावधीत जे दूध वाटप करणारे व्यवसाईक तसेच भाजीपाला व फळविक्रेते आहेत, त्यांची प्रथम कोविड टेस्ट करूनच त्यांना दूध वाटपासाठी व भाजीपाला व फळे विक्रीसाठी अत्यावश्यक पास देण्याचे नियोजन करावे,कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर