
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
जगभरात चाललेली धोरणाची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांना कोविड केअर सेंटर उभारण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केल्यामुळे अशा ग्रामपंचायतींना जनहिताच्या व लोकांच्या काळजीपोटी कोरोना सेंटर उभा करण्याची गरज निर्माण झाली आहे.ही गरज लक्षात घेऊन मांडवे येथे रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी संचलित रत्नत्रय इंग्लिश स्कूल मांडवे व ग्रामपंचायत मांडवे यांच्या संयुक्त विद्यमानाने पंधरा बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अनंतलाल दादा दोशी व श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी श्री सन्मती सेवा दलाचे अध्यक्ष श्री विरकुमार दोशी , रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव, श्री प्रमोद दोशी , श्री. जयवंत पालवे, मांडवे गावचे संरपच हनुमंत टेळे, पुरदावंडे संरपच देविदास ढोपे, सदाशिवनगर गामपंचात सदस्य, श्री विष्णू भोंगळे, मांडवे गामपंचात सदस्य कुमार पाटील, बबन पालवे, रामभाऊ गायकवाड, ज्ञानेश्वर पालवे , महादेव पालवे, विठ्ठल पालवे ,सुनील खुडे, महादेव वाघमोडे, अमोल शिंदे,श्री विरेन्द्र दोभाडा , डॉ. लवटे, डॉ. चव्हाण मॅडम, श्री गुजरे, झेंडे सिस्टर नाकुरे,डॉ.केंगार, डॉ. पोतलकर, गजानन पालवे, राजू शिंदे मुख्याध्यापक अमित पाटील सर ग्रामसेवक भोसले, शिपाई दत्ता गायकवाड इत्यादी ग्रामस्थ व समाज सेवक उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर