प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी सौ.अनुराधा ढोबळे यांचे हृदयविकाराने निधन

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

मोहोळचे माजी आमदार तथा माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील रुग्णालयात दि. ४ मे रोजी पहाटे निधन झाले.मृत्यूसमयी त्या ५८ वर्षाच्या होत्या. ‘ सावली ‘ वुमेन्स फाउंडेशनच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे , मुलगा अभिजीत ढोबळे , सून शारोन अभिजीत ढोबळे , दोन मुली क्रांती आवळे व कोमल साळुखे तसेच जावई अब्राहम आवळे , अजय साळुखे व नातवंडे असा मोठा परिवार आहे . त्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या . त्यांच्या जाण्याने शाहू परिवार व महात्मा फुले सूत गिरणी परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.