मे.बाबा कंट्रक्शनचे नोंदणी प्रमाणपत्र काळ्या यादीत टाकण्याची माहिती सेवा संस्थेची मागणी
59 फाटा ते चौगुले वस्ती या रस्त्याचे काम बनावट नोंदणी पत्र दाखवून करण्यात आले म्हणून माहिती सेवाभावी संस्था करणार हलगीनाद आंदोलन
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
मे.बाबा कंट्रक्शन प्रो.प्रा.संजय बाबुराव मोटे यांनी माळशिरस नगरपंचायत माळशिरस बांधकाम विभागाने 9/02/2021 ते 16/02/ 2021 या कालावधीमध्ये विकास कामाच्या निविदा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करून ही निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मे.बाबा कंट्रक्शन यांनी सहभाग घेतला होता. परंतु नगरपंचायतच्या वतीने एखाद्या कंट्रक्शन निविदा भरली असतानाच त्याची शहानिशा करणे बंधनकारक असून त्याची नगरपंचायतीचे बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे शहानिशा केली नसून या प्रकरणामध्ये संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने या सर्व गोष्टी झालेल्या दिसून येत आहे. यामधील अधिकारी व ठेकेदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे, तसेच मे.बाबा कंट्रक्शन यांच्यावर माळशिरस नगरपंचायत माळशिरस यांची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, मे.बाबा कन्ट्रक्शनचे नोंदणी प्रमाणपत्र कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात यावे, 59 फाटा ते चौगुलेवस्ती या कामाची फेर निविदा करण्यात यावी, यासाठी माहिती सेवाभावी संस्था यांच्यावतीने मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य सरचिटणीस धनंजय थोरात, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन रणदिवे, साहेबराव श्रीमंत कोळेकर उपस्थित होते. जर झालेल्या प्रकरणांमध्ये दिरंगाई अथवा टाळाटाळ केली, तर दिनांक 07/05/2021 रोजी माळशिरस नगरपंचायत माळशिरस या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात हलगीनाद आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन अधिकारी सोलापूर यांना देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
आधार स्वयंसहाय्यता बचत गटाचा शतकमासपूर्ती समारंभ
मंगळवेढा साखर कारखाना येथे मोळीपूजन
मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही- जिल्हाध्यक्ष महेश खराडे