संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
गेली दोन वर्ष माळशिरससह सोलापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित पिक विमा 2019/2020 सालीचा बजाज आलियांज कंपनीकडे भरला होता. तर 2020/ 2021 चा पिक विमा केंद्र सरकारने सातारा,सोलापूर व जळगावसाठी भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती केली आहे. दरवर्षी मार्चअखेर/पर्यंत पिक विमा शेतकऱ्यांना मिळतो. परंतु आत्ता एप्रिलमध्येही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना निवेदन दिले. यावेळी खासदार नाईक-निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून लवकरच पिक विमा कंपनी व शेतकरी यांची बैठक लावणार असल्याचे सांगितले.गेली अनेक दिवसांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली.यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः 40 टक्के व सरकार 60 टक्के भरत असते. त्यामुळे प्रचंड प्रमाणात रक्कम जमा करून कंपन्या शेतकऱ्यांना विमा देण्यास टाळाटाळ करत आहेत. प्रत्येक वेळी आंदोलन केल्याशिवाय विमा कंपन्या विमा देत नाहीत असा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. तर तर गेली दोन वर्ष covid-19 मुळे पिकांना दर नाही. यातच अवकाळी पाऊस येत आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. तरी विमा कंपन्यांना जाग येत नाही.यामुळे खासदार रणजीत निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी समवेत बैठक घेण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले .यावेळी के. के. पाटील, सरचिटणीस संजय देशमुख, तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, शिवराज पुकळे, बालाजी नरळे आदी मान्यवर उपस्थित होते .

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा