आवंढीत पाणी पाहून लोकांना आनंद झाला!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जतच्या उत्तर भागातील आवंढी भागात बंदीस्त पाईपलाईनमधून म्हैसाळ योजनेचे पाणी गुरुवारी दाखल झाले. गेल्या आठ दिवसांपूर्वीच आमदार विक्रम सावंत यांनी या भागाला पाणी देण्याचा शब्द दिला होता. आमदार सावंत यांनी दिलेला शब्द खरा केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
म्हैशाळ योजनेतून गुरुवारी अंतराळ सिंगनहळळी बंदिस्त जलवितरिका-पाईपलाईनचे अंतराळ येथे आमदार सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, रवींद्र सावंत, नगरसेवक भुपेंद्र कांबळे, प्रदीप कोडग, सहायक कार्यकरी अभियंता अमोल चोपडे यांच्यासह ग्रामस्त उपस्थित होते.
यावेळी आमदार सावंत म्हणाले, जत तालुका शंभर टक्के सिंचनाखाली आणणे हे माझे ध्येय आहे. यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. चालू उन्हाळी आवर्तनात या भागात पाणी देण्याचा शब्द दिला होता, आज तो पूर्ण होत आहे.यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री विश्वजित कदम यांनीही चांगली मदत केली. आता मे महिन्यापर्यंत उमदी भागात पाणी देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा