अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जत तालुक्याला भेट देऊन सर्व खात्याचे प्रमुख यांची बैठक घेतली.जिल्हापातळीवर ज्याप्रमाणे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी ,महानगरपालिका आयुक्त यांचेत समन्वय आहे, तशाचप्रकारे तालुका पातळीवरदेखील सर्व घटक प्रमुखांनी समन्वय ठेवून काम केल्यास प्रभावी काम होईल व लवकरच कोविड या संसर्गजन्य आजाराचां प्रसार रोखू शकू.पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी यावेळी जिल्हाबंदीचे चेक पोस्ट, कंटेनमेंट झोन, कोविड केअर सेंटर, लसीकरण केंद्रे,हॉटस्पॉट इत्यादीबाबत आढावा घेतला. तसेच नागरिकांना नियमांचे पालन करणेबाबत आवाहन केले. कोणीही विनाकारण घरा बाहेर पडणार नाही, मास्क, सामाजिक अंतर इत्यादीचा काटेकोरपणे अवलंब करतील,तसेच जे रुग्ण गृहविलगीकरणात आहेत ते बाहेर फिरणार नाहीत,लक्षणे आढळून येताच, नागरिकांनी त्वरित तपासणी करून घ्यावी व लवकर औषध उपचाराला सुरुवात करावी, जेणेकरून प्राथमिक अवस्थेतच तो आजार बरा करता येईल याबाबतचे आवाहन केले आहे. या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटी,उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर, गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर