निंबवडेत कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरवात

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/निंबवडे:
निंबवडे येथे आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.गेल्या वर्षभरापासून गावात कोरोनाच्या जनजगृतीसाठी गावातील आरोग्य दक्षता समिती आणि आरोग्य अधिकारी,कर्मचारी लढत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अतिशय योग्य समन्वय राखत गावात यंत्रणा राबवण्यात आली होती. आता लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा मोहीम स्वरूपात जागृती करण्यात येत असून 45 वर्षे वयाच्या वरील स्त्री-पुरुषांना ही लस देण्यात येत आहे.
या लसीकरणाचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी सौ. साधना पवार,दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक पवार, पंचायत समितीच्या माजी उपसभापती पुष्पाताई जयवंत सरगर, निंबवडेच्या लोकनियुक्त सरपंच नंदाताई देठे ,वाक्षेवाडीच्या सरपंच शीतल वाक्षे,ग्रामसेवक संजय कर्णे , उपसरपंच नाथा बुधावले, सदस्य विक्रम देवडकर, पोलीस पाटील आप्पासाहेब मोटे ,निंबवडे पोलीस पाटील प्रवीण मंडले , डॉ. संदीप लवटे ,आरोग्य सेवक संजय कदम , समाजसेवक नामदेव शेठ मोटे ,विजय मोटे, गणेश देवडकर, आरोग्य सेविका तळपे, सिस्टर भानुसे उपस्थित होते.

गाव कोरोनाशी वर्षभर झुंज देत असून जनतेच्या सहकार्यातून अतिशय उत्तम प्रतिसादात आता लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. तरी गावातील स्त्री-पुरुष यांनी नियमानुसार लसीकरण करून घेऊन प्रशासनास सहकार्य करावे: संजय कदम