वीजबील भरलेल्या कृषी योजनेतील शेतकर्‍यांचा मंडळाने केला सत्कार

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शेतीपंपाची थकीत देयक बाकी जमा करण्यासाठी कृषी योजना 2020 राबवली आहे.या योजनेला तालुक्यातील थकीत शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत मूळ बिलाच्या थकीतावर लावलेले दंड व्याज माफ केले आहे.तसेच मूळ बिलात ५०%टक्के सूटही दिली आहे.मात्र ३१ मार्चअखेर भरणा करण्याची अट आहे. त्यानंतर रक्कम भरणाराला ३०% माफी दिली आहे.
आटपाडी तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली थकबाकी शेतीपंपाचे बिल भरून या योजनेचा लाभ घेतला आहे.त्यातील जितेंद्र पंडितराव देशमुख एक लाख, ७९ हजार आटपाडी, कुंडलिक काळेल,गळवेवाडी एक लाख, १६हजार, शहाजी गणपत पाटील-आटपाडी,एक लाख ७५ हजार, मोहन गेळे,१ लाख,१२ हजार१३०,सुखदेव कटरे भिंगेवाडी,६५००० ,दादा हुबाले तडवळे एक लाख,४०हजार,सुखदेव (शेठ) कदम गोमेवाडी ८५ हजार रुपयांची वीज बिले भरली आहेत. या शेतकऱ्यांचा उपकार्यकारी अभियंता संजय बालटे, अभियंता युवराज तळे,अभियंता सुनील पवार,शाखा अभियंता शिवानंद पट्टणशेट्टी सहाय्यक,लेखापाल केदार कनगले व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.