माळशिरसमध्ये कुक्कूट पिल्लांचे वाटप

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

आदिवासी उपयोजना व एकात्मिक कुक्कूट विकास योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2019-20 मधील 50% अनुदानावर 180 लाभार्थीना प्रत्यकी 100 प्रमाणे 18 हजार एकदिवशीय कुक्कूट पिल्लाचे वाटप विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती शोभाताई साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील,जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, संगीता मोटे, पंचायत समिती सदस्य प्रतापराव पाटील, नानासाहेब नाईकनवरे,मानशिंग मोहिते, हेमलता चांडोले, शिवामृत दूध संघांचे संचालक लक्ष्मण तात्या पवार, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील माने, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनचे सचिव अरविंद भोसले,विष्णू केमकर, शौकत शेख, राजेंद्र रोगे, दत्तू सरगर, सह. गटविकास अधिकारी शिवाजी पाटील,पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश रेडे पाटील, डॉ. विजय घनवट, डॉ. भास्कर पराडे, डॉ. नवनाथ ठवरे पशुसंवर्धन अधिकारी कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.