
कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /दिघंची:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. आटपाडी तालुक्याच्या पाणी प्रश्नाबरोबरच विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.
तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी स्वागत केले.
यावेळी आटपाडी पंचायत समितीच्या माजी सदस्या जयमाला देशमुख, भारततात्या पाटील, कल्लाप्पा कुटे, युवानेते रोहित देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ लोहार,प्रतापसिंह देशमुख,तालुका सरचिटणीस समाधान भोसले,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री जयंतराव पाटील म्हणाले, आटपाडी तालुक्याच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून पाणी योजनेबाबत प्राधान्यक्रमाने लक्ष घालणार आहे. टेंभू योजनेच्या पाण्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका घेण्यात येणार आहे.यासाठी आटपाडी तालुक्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये बैठक आयोजित करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बळकटीकरणासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संघटन मजबूत केले जाणार आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन