शिराळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरण मोहिम

डी.आर.वानखडे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ शिराळा:

शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३१जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली.शिराळा केंद्रातील सतराही गांवात प्रत्येक बुथवर ० ते ५ वर्षातील बालकांना पोलिओ डोज देण्यात आला. त्यानिमित्त्याने शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील बुथचे उद्घाटन पत्रकार डी.आर.वानखडे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळेस वैद्यकिय अधिकारी डॉ.नरेंद्र खंडारे, डॉ. विक्रांत गंधे ,एएनएम निकिता लोहवे ,अंगणवाडी सेविका मिराताई कडु ,संगिता बारी व चालक राजू झाकर्डे ,इतर बुथवर प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर कर्मचारी,अंगणवाडी सेविका यांनी उपस्थित राहुन सेवा दिली.