मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर उद्या आ.गोपीचंद पडळकर यांची युनिक फार्मा अँड सर्जी केअरला सदिच्छा भेटहोणाऱ्या फर्मला सदिच्छा भेट देऊन डॉ. सप्तेष जाधव व सहकाऱ्यांचा सन्मान केला.
यावेळी आज डॉ. सप्तेष जाधव यांनी ५ किलो ६०० ग्रॅम वजनाची पोटातील कॅन्सरची गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल आमदार पडळकर यांनी कौतुक केले. युनिक फार्मा केअरला शुभेच्छा दिल्या.यावेळी आमदार पडळकर यांनी बहिर्जी नाईक यांच्या स्मारकासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे जवळचे सहकारी प्रगतशील बागायतदार यशवंतराव मेटकरी,सांगली जिल्हा प्राथ. शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक यु .टी.जाधव, चंद्रकांत काळे यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी प्रमोद सपाटे,संतोष टकले,अविनाश दिवटे आदी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर