अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
महात्मा गांधी योजनेच्या रोजगार ग्रामीण संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे,असे मत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जत तालुका कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण यांनी व्यक्त केले.
शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय तसेच ग्रामीण आर्थिक चक्राला चालना मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नावाने राज्य शासनाने मनरेगा संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. या योजनेतून ग्रामीण भागातील रोजगाराची मागणी पूर्ण होऊन ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे,असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविणे आणि राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही योजना अत्यंत उपयोगी ठरणार आहे. मनरेगा योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत गाय व म्हैशीकरीता पक्का गोठा बांधणे,शेळीपालन व शेड बांधणे, कुक्कुटपालन व शेड बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. चारही कामे अनिवार्यपणे सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबवायचे असून, शेतकऱ्यांना भरीव अनुदान देण्यात येणार आहे. शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल व शेतीसाठी उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत निर्माण होण्यास मदत होणार आहे.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन