जमिनीचे आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक : दिनकर पतंगे


अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जागतिक मृदा दिन सप्ताहानिमित्ताने मौजे जिरग्याळ येथे दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी आयोजित केलेल्या मृदा दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री दिनकर पतंगे यांनी सांगितले. आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक जास्त आहेत किंवा कोणते घटक कमी आहेत हे तपासून घेऊन त्याच्या आधारे पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि माझी तंत्र अधिकारी कृषी श्री डी जी वज्रशेट्टी यांनी जमिनीतील माती नमुना कसा घ्यावा त्यासोबत जिरायत बागायत आणि फळपिकांचा माती नमुना कसा घ्यावा त्यावर लेबलिंग कसे करावे त्याच बरोबर माती परीक्षणानुसार खते कोणती व कशी द्यावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर मृदादिनाचे आयोजन महाराष्ट्र कामगार सेनेचे डफळापुर विभागप्रमुख श्री चैतन्य कोरे आणि उपशाखाप्रमुख श्री रामदेव मिसाळ यांनी आयोजित केले. तद्नंतर पद्मावती सुभाष मिसाळ यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर त्यांना महाराष्ट्र कामगार सेना महिला आघाडी शाखाप्रमुख पदी निवड करण्यात आली. या शिबिरास तीस शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. अलीकडे जत तालुक्यात कामगार सेनेच्या वतीने शेतकऱ्यांचे मेळावे मार्गदर्शक शिबिरे आयोजित करत असल्याचे श्री पतंगे यांनीसविस्तर मार्गदर्शन करण्याचे शिबिरे आयोजित करणार असल्याचे  सांगितले. नजीकच्या काळात प्रत्येक पीकनिहायसविस्तर मार्गदर्शन करण्याचे शिबिरे आयोजित करणार असल्याचे सांगितले.