कोसारी येथे पीक व पाणी व्यवस्थापन कार्यशाळा

सुभाष हाक्के
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /कोसारी:

GLDP कार्यक्रमाअंतर्गत कोसारी येथे पीक व पाणी व्यवस्थापन कार्यशाळा कोरो इंडिया मुंबई व आशामंत फौंडेशन आणि ग्रामीण विकास संस्था कोसारी यांच्या माध्यमातून पार पडली. गावातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या.
कोरो इंडियाचे प्रतिनिधी माधवभाऊ गडदे,पांडुरंग शिंदे (कृषी सहाय्यक), परशुराम मळ्ळी (कृषि सहाय्यक),अवधूत भोसले (इंजिनिअर ),स्वप्नील साळे व आरोग्य सेविका मुक्ता गीते उपस्थित होते. जत तालुक्यातील दुष्काळी गावांमध्ये पीक व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल याबद्दल माधवभाऊ यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कृषिसहायक यांनी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने पीक व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन कसे करता येईल यावर माहिती सांगितली. या माहितीमधून लोकांना पीक व पाण्याचे महत्व समजले.त्याचबरोबर लीडर विवेक टेंगले पाण्याच्या पुनर्वापरामधून मांडव पध्द्तीने परसबाग कशी करावी याबद्दल माहिती सांगितली. कोरोच्या माध्यमातून झालेले शिक्षण याबद्दल माहिती दिली. शिक्षक भारतीच्या वतीने सावित्री- फातिमा पुरस्कार मिळालेल्या सौ. मंगल भोसले यांचाही सन्मान करण्यात आला.
सोबती गटाचे विश्वास खटके यांनी सर्वांचे आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सोबती गटाचे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमासाठी फोनच्या माध्यमातून कोरो इंडियाचे सुर्यकांत,आशामंत संस्थेचे अध्यक्ष बारबोले,विभागीय समन्वय सचिन लवटे यांनी मार्गदर्शन केले.