कोसारी येथे मका बियाणे वाटप

सुभाष हाक्के
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ कोसारी:

महिला आर्थिक विकास महामंडळ व बायर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने व क्रांती लोकसंचलित साधन केंद्र जत, व ग्रामीण विकास संस्था,कोसारी माध्यमातुन बचत गटातील 30 शेतकरी महिलांना मोफत मका बियाणे मोफत वाटप करण्यात आले.
क्रांती लोकसंचलीत साधन केंद्र जतचे व्यवस्थापक पिराजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कोसारी येथे मक्का बियाणे वाटप करण्यात आले.

ग्रामीण विकास संस्था सातत्याने ग्रामीण भागातील समस्यांवर काम करत आहे. त्यात प्रामुख्याने महिला सक्षमीकरण , पर्यावरण , पाणी , शिक्षण, आरोग्य व भटक्या समुदयावर काम करत आहे. त्याचबरोबर कोरो इंडिया मुंबई ,यांच्या माध्यमातून पाणी या विषयावर व लोकपुढाकार या प्रकल्पाच्या माध्यमातून 3 गावामध्ये गाव स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने काम करत आहे.इकोनेट, पुणे या संस्थेच्या माध्यमातून भटक्या समुदायातील महिलांचे हक्क व अधिकारावर तीन वर्षे काम करत आहे. कोरो इंडिया, मुंबई व इकोनेट, पुणे आणि ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात कोसारी, गूळवंची, प्रतापूर, हिवरे, कुंभारी, शेगाव आणि जत येथील 160 गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप आशामंत फौंडेशन माढा यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
आतापर्यंत ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून कोसारी, गुळवंची व प्रतापूर गावामध्ये 21 महिला बचत गट स्थापन केलेले आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना डिजिटल साक्षर, त्यांचे प्रशिक्षण व त्याचबरोबर व्यवसायिक प्रशिक्षण महिला आर्थिक विकास महामंडळ व क्रांती लोकसंचालित साधन केंद्र जतकडून अर्थसहाय्य मिळवून छोटे-छोटे व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.त्याचबरोबर शासनाचा संवादनी उपक्रमही राबवलेला आहे.हे सर्व कार्य संस्थेच्या कार्यवाही समितीच्या अध्यक्षा विमल साळे व मनीषा काळे यांच्या नियंत्रणामध्ये चालते.
शेतीशी निगडित कृषी विभागाच्या माध्यमातुन कृषी सहाय्यक परशुराम मळळी यांच्या मार्गदर्शनाखाली 4 शेतीशाळा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतलेल्या आहेत.त्या माध्यमातुन माती परीक्षण कसे करायचे? वेळोवेळी वेगवेगळ्या पिकावर येणाऱ्या रोगांचे नियंत्रण कसे करायचे? अशा अनेक शेतीशाळा सरळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतलेल्या आहेत. शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेत मोफत 16 शेतकऱ्यांना अर्ज भरून दिलेले आहेत व त्यांना मंजुरीही मिळालेली आहे. यासाठी मार्गदर्शन कोरो इंडिया, मुंबई संस्थेचे सूर्यकांत कांबळे, आप्पाराव राठोड, हणमंत बारबोले, वैशाली रायते, मुनिर शिकलगार, बाळासाहेब रणपिसे, सचिन लवटे यांचे लाभले आहे. जत तालुक्यामध्ये जलव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पाण्यासाठी कोरो इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु होणार आहे असे अध्यक्ष विवेक टेंगले यांनी सांगितले.यासाठी सागर गुजले, दिगंबर गोरे, विश्वास खटके, रुपाली खरात, विशाल महारनुर ही संस्थेची कार्यकर्ता टीम काम करत आहे.