
शिराज शिकलगार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/विटा :
विटा येथे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे या मागणीसाठी भक्तराज ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली विट्यासह खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला.
शेतकऱ्यांकडून मका खरेदी करताना व्यापारी मोठ्या प्रमाणात लूट व फसवणूक करतात. मक्याची आधारभूत किंमत 1850 रुपये असताना व्यापारी 1200 ते 1250 रुपयांनी मका खरेदी करतात. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.
विटा शहरातील लेंगरे रोड येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तहसिलदार कार्यालयापर्यंत घोषणा देत हा मोर्चा आयोजित केला. भक्तराज ठिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तहसिलदार शेळके यांनी दोन दिवसांत विट्यात मका खरेदी केद्र सुरू करू असे सांगितले.


संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा