आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या फंडातून आरोग्य विभागास सुमारे वीस लाखाचे साहित्य वाटप

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या आमदार फंडातून व विक्रम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जत तालुका आरोग्य विभाग व जत प्राथमिक उपकेंद्र यांना बेड,ऑक्सिजन मशीन, रक्तदाब तपासणी मशीन,प्लस मशीन,सॅनिटाईझर N95 मास्क,ग्लोज या साहित्याचे वाटप आ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, पं.स.चे माजी सभापती बाबासाहेब तात्या कोडग,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे,विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम,उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे,तहसीलदार सचिन पाटील,गट विकास अधिकारी धरणगुत्तेकर,तालुका आरोग्य अधिकारी बडंगर,डॉ.मोहिते व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.