
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /कवठेमहांकाळ:
नांगोळे (ता.कवठेमहांकाळ) येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत उपविभागीय कृषि अधिकारी वेताळ यांचे हस्ते शामराव सातपुते यांचे शेतामध्ये बांधावर फळबाग लागवड कार्यक्रम घेणेत आला.तसेच जीवामृत, दशपर्णी अर्क कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक करणेत आले.
उपविभागीय कृषि अधिकारी वेताळ, तालुका कृषि अधिकारी तोडकर, मंडळ कृषि अधिकारी दडस,कृषि पर्यवेक्षक संतोष पांढरे, प्रशांत चव्हाण, कृषि सहाय्यक राजु सकटे, नितीन डोके, शशी चव्हाण, गजानन अजेटराव, प्रविण तांदळे, सौ. गगनमाले तसेच शेतकरी तानाजी खोत, अमित वाघमोडे, रमेश फोंडे, भगवान सातपुते, दयानंद सातपुते आदि उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा