
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने तहसीलदार माळशिरस यांना केंद्र सरकार यांनी लागू केलेले कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकारच्या महा विकास आघाडीने राज्यामध्ये लागू न केल्याच्या निषेधार्थ त्यांना निवेदन देण्यात आले व केंद्र सरकारने हे विधेयक लागू केल्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती घडणार आहे असे हे ऐतिहासिक बिल केंद्राने दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करून लागू केले परंतु महाराष्ट्र मध्ये असलेले शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने केंद्र सरकारच्या या चांगल्या योजनेचा लाभ जाणून बुजून शेतकऱ्यांना होऊ द्यायचं नाही या उद्देशाने हे बिल लागू करत नाही त्यामुळे त्याचा निषेध करत माननीय तहसीलदार जगदिश निबांळकर यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी माजी तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, भाजपाचे जेष्ठ नेते के के पाटील ,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे ,सरचिटणीस संजय देशमुख ,आत्मनिर्भर अभियानचे हनुमंत कर्चे, हनुमंत दुधाळ ,युवराज वाघमोडे, किशोर तुपसुदौर ,प्रवीण काळे ,शरद मदने , धनाजी चव्हाण, विनोद थेटे ,ज्ञानेश्वर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा