पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर रोपवाटिका व कृषी यांत्रिकीकरण कृषि यंत्र सामुग्री व उपकरणे या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

संजय हुलगे
माळशिरस/ प्रतिनिधी:

भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सुरु केली आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी  2 ऑक्टोबर ते  19 ऑक्‍टोबर २०२० पर्यंत अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन आणि पाण्याची कायमची सोय हवी. तसेच महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून महिला शेतकरी गटाला द्वितीय प्राधान्य राहणार आहे. यानंतर भाजीपाला उत्पादक अल्प आणि अत्यल्प भुधारक शेतकरी तसेच शेतकरी गटांना प्राधान्य असणार आहे.
यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे सात-बारा, 8अ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स,आधारकार्ड,कृषी पदवीबाबतचे कागदपत्रे,महिला शेतकरी गट असल्यास त्याचे नोंदणीपत्र आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी https:// mahadbt mahail.gov.in या संकेत स्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन  तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे यांनी केले आहे .
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन 2020 ते 2021 पर्यंत या योजनेमध्ये घटक क्र.3 अंतर्गत कृषी यंत्र सामुग्री व उपकरणे अर्थसाह्य (अनुदानावर ट्रॅक्टर व कृषी अवजारे पुरवठा ) तसेच भाडेतत्त्वावर कृषी यांत्रिकीकरण अवजारे बँक स्थापन करण्यासाठी https://mahadbt mahail.gov.in  या संकेतस्थळावरून तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे यांनी केले.