
मुख्तार मणियार
औसा/प्रतिनिधी:
लातूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हाहाःकार माजवला.अनेक गाव खेड्यातील उभ्या सोयाबिनाच्या पिकात पाणी उभारल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या काही भागातील सोयाबिन वाहून गेले तर काही भागातील सोयाबिनच्या शेंगांचीच पुन्हा उगवण होत असल्याने जिल्ह्यातील सोयाबिन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे .राज्य शासनाने सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
लातूर जिल्ह्यात ४ लाख ५० हजार २७६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनचा पेरा झाला आहे. चालू वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पुरेसा पाऊस झाला. मध्यंतरीच्या काळात गरजेनुरूप पाऊस झाल्याने सोयाबिन पिकांच्या वाढ योग्य होत असतानाच गत दोन दिवसापासून पावसाने लातूर जिल्ह्यात हाहाःकार माजवाय नदी नाले ओढे दुथडी भरुन वाहत असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उभ्या सोयाबिन पिकात पाणी घुसल्याने मोठी आर्थिक नुकसान झाली आहे. राज्य शासनाने सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
पावसाचा हाहाकार – सोयाबीन पाण्यात,सोयाबीन शेंगाला फुटले मोड
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पिके चांगली बहरात आली होती. मात्र ऐन काढणीच्या अगोदरच पावसाचा जोर वाढला असल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.
नगदी पीक म्हणून सर्वच शेतकरी सोयाबीन पिकाचा पर्याय निवडत आहेत.
सर्वत्र सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर होता मात्र गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस पडत असल्याने सोयाबीन पिवळे पडत आहे.
सततच्या पावसामुळे लामजना तपसे चिंचोली परिसरात काढणीला आलेल्या सोयाबीनला चक्क कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे तीन तेरा झाले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तपसे चिंचोली ,लामजना परिसरात या अगोदर झालेल्या चांगल्या पावसामुळे मूग ,उडीद ही पिके चांगली आली होती मात्र ऐन काढणीच्या वेळी पावसाने भिजून गेली.
त्यात चांगल्या उत्पन्न मिळेल या अपेक्षेने आता हाताशी आलेल्या सोयाबीन पिकाला पावसाचा तडाखा बसत आहे.
सोयाबीन काढणीला आलेल्या शेंगाला अक्षरशः कोंब फुटले आहेत.
होत असलेले नुकसान पाहता तात्काळ येऊन प्रशासनाने खरीपातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी तपसे चिंचोली लामजना , गाडवेवाडी, गोटेवाडी इत्यादी गावांतील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.


संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा