अनिल मदने
जत/प्रतिनिधी:
नेसरीच्या रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कु.श्रीशैल अभिमन्या लोणी या कृषीदूताने ग्रामीण कृषी जागृकता व औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उमदी येथे नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रण कसे करावे,याबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आले.
सुरुवातीला सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत व प्रास्ताविक कु. श्रीशैल अभिमन्या लोणी यांनी केले .त्यानंतर कीड नियंत्रण करताना कोणकोणते ट्रॅप्स व ल्युअस वापरतात.तसेच वापरण्याची पद्धती यांचे संपूर्ण प्रात्यक्षिक करुन दाखवले.एकरी प्रमाण व ल्युअर बदलण्याचा कालावधी हे सर्व शेतकऱ्यांना सांगितले. तसेच हे प्रात्यक्षिक करत असताना शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्नांचे निरसन कु. श्रीशैल अभिमन्या लोणी या कृषीदूताने केले. हे प्रात्यक्षिक covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करुन पार पाडले .प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. बी. बिरादार , समन्वय प्रा .एम. डी. माळी, कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. बी. कडपे , विषय प्रमुख प्रा. एल. कोरवर यांचे मार्गदर्शन लाभले.


संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा