
अनिल मदने
जत / प्रतिनिधी :
जत तालुका हा सीमाभागातील अत्यंत दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका महाराष्ट्रतील सर्वात मोठा तालुका असून 53 गावे खरीप तर 67 गावे रब्बी पिकाखाली आहेत. तालुक्यातील खरीप क्षेत्र 45 हजार हेक्टर पेरणी झालेले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तालुक्यातील अनेक शेतकरी हक्काचे पीक म्हणून मका आणि उडीद पेरणी करीत आहेत. यावर्षी देखील काही भागात पाऊस चांगला झाला आहे. शेतकऱ्यांनी साधारणपणे 5 हजार हेक्टर क्षेत्र उडीद व 7 हजार हेक्टर क्षेत्र मका पेरणी केली आहे. पाऊस चांगला असल्याने उत्पादन देखील चांगले आले आहे राज्यशासनाने उडीद हमीभाव 6100 रुपये तर मका 1760 रुपये जाहीर केला आहे. परंतु व्यापाऱ्यांकडून उडीद 4500 ते 5200 रुपये तर मका 1200 ते 1350 या दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे जत व परिसरातील उत्पादित केलेले पीक हे येथेच शेतकऱ्यांना विकता किंवा खरेदी करता यावे, यासाठी राज्यशासनाने खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी जत मार्केट कमिटीचे माजी सभापती तथा केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक माजी प्रकाश जमदाडे यांनी निवेदनद्वारे नायब तहसीलदार विभुते यांच्याकडे केली आहे. यावेळी निगडी (खुर्द ) चेअरमन बाळकृष्ण शिंदे,माजी सरपंच अशोक गायकवाड,सचिन माने उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा