
सुभाष हाक्के
कोसारी /प्रतिनिधी:
कोसारी गावात कोरोनाचा शिरकाव झाला असून दोघाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात अनेकजण असल्याची शक्यता आहे. प्रशासन यंञणा कोणाशी लढण्यासाठी सज्ज झाली आहे.ग्रामपंचायतीने तातडीने पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेल्या परिसरात औषध फवारणी केली.यावेळी कोसारी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय भाते,सरपंच तानाजी बिसले आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी जनतेला घरीच राहा सुरक्षित रहा,कोरोना या महाभयानक रोगापासुन बचाव करा असे आवाहन केले आहे अशी माहीती उपसरपंच बाळासाहेब पवार यांनी प्रगल्भनायकशी बोलताना दिली.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर