
अनिल मदने
जत/प्रतिनिधी:
जत शहरातील कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालल्याने शहरातील कोरोनाची साखळी रोखण्यामध्ये जत शहर कोरोना नियंत्रण समितीने शुक्रवार दि.११ सप्टेंबर पासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जत शहर कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष संजयराव कांबळे यांनी दिली.
कांबळे म्हणाले की,जत शहरातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या ही दिडशेच्या वर गेली आहे. या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जत शहरातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता जत शहर हे कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले आहे.
शहरातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असून कोरोनामुळे बळी जाणारे रूग्णही वाढत आहेत. जत शहरातील विविध प्रकारचे व्यवसाय करणारे व्यावसाईक जास्त प्रमाणात कोरोनाबाधित झाले आहेत.
पोलिस प्रशासन,महसुल प्रशासन व जत नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जत शहरातील व्यापारी असोसिएशन व कोरोना नियंत्रण समितीने जत शहरातील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असलेली कोरोनाची साखळी रोखण्यासाठी शुक्रवार दि.११ सप्टेंबर पासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे.
या जनता कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवा, दूध तसेच मेडीकल व दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंद असतील. हा जनता कर्फ्यु हा कोरोनाला रोखण्यासाठी असून जत शहरवासियांनी जनताकर्फ्युचे कालावधीत कोरोना नियंत्रण समितीने जाहीर केलेल्या निर्देशानुसार वागण्याचे आहे.
जनताकर्फ्युचे कालावधीत कोरोना नियंत्रण समिती,पोलीस प्रशासन,व्यापारी असोसिएशन व जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच कार्यालयीन कर्मचारी व सर्व नगरसेवक यांचे लक्ष जत शहरावर राहणार आहे.
जनताकर्फ्युचे कालावधीत जत शहरवासियांनी शक्यतो घरातच राहून हा जनताकर्फ्यु शंभर टक्के यशस्वी करावा व कोरोनाचे या लढाईत जत महसुल प्रशासन,पोलीस प्रशासन,जत नगरपरिषद जत व्यापारी असोसिएशन व जत शहर कोरोना नियंत्रण समितीला चांगल्या प्रकारे सहकार्य करावे व कोरोनाला हद्दपार करावे अशी अपेक्षाही बैठकीत उपस्थित असणारे जत शहरातील विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी व नेतेमंडळी यानी व्यक्त केली.
या बैठकीला जत नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक विजय ताड,राष्ट्रीय काॅग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय उर्फ नाना शिंदे,दलित पॅथरचे नेते नगरपरिषदेचे सभापती भूपेंद्र कांबळे ,शिवसेनेचे जेष्ठ नेते दिनकर पतंगे,जागर फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक परशुराम मोरे,सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे,ब.स.पा.तालुका अध्यक्ष तानाजी व्हनखंडे,कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग बामणे,सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर माळी,व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रज्वल साळे,गौतम ऐवळे,जयंत भोसले,दिनेश जाधव,सचिन जाधव,जारीक अपराज,किशोर कोहळळी,विजय काटे आदीसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर