पिक नुकसानीच्या मदतीसाठी आ. पवार यांचा मॅरेथॉन दौरा

मुख्तार मणियार
औसा/ प्रतिनिधी:
पीक नुकसानीची पाहणी,आढावा बैठक, बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे पिक नुकसानीची मागणी व तातडीने मुंबईकडे रवाना होवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून अधिवेशनात मुद्दा मांडणीस विनंती असा मॅरेथॉन दौरा करण्यात झाला. लातूर जिल्ह्यात पीकांचे आतोनात नुकसान झाले आहे.याबाबत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, याबाबत पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडून मदत द्यायला भाग पाडावे अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून लातूर येथील मराठवाडा मेट्रो कोच कारखाना पाहणीचा वृत्तांत त्यांच्यासमोर मांडला आहे.
औसा मतदारसंघातील गावात जावून खरिप हंगामातील सोयाबीन, उडीद व मूग या पीकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आ. अभिमन्यू पवार यांनी त्याचदिवशी औसा येथे आढावा बैठकीतून कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून पीक परिस्थितीचा संपुर्ण आढावा घेतला. सोयाबीन नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे करून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तसेच पिकविमा नुकसानीच्या नियमानुसार २५ टक्के आगाऊ देणेबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी करुन तातडीने मुंबई गाठत महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मतदरसंघातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केलेल्या पाहणीतून समोर आलेली विदारक परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली.
लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील सोयाबीन,उडीद व मूग या पीकांचे म्हणजे संपूर्ण खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवसांचे असल्याने माझ्यासारख्या नव्या आमदाराला बोलण्यासाठी वेळ मिळण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे हा विषय सभागृहात मांडून सरकारला मदत द्यायला भाग पाडावे अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
३० आॅगस्ट रोजी लातूर येथील मराठवाडा मेट्रो कोच कारखाना,भेटीचा संपूर्ण वृत्तांत देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडला.दिवंगत प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या आगामी जयंतीपासून या कारखान्यातून प्रत्यक्ष निर्मिती सुरू करण्याच्या विनंतीला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी तत्वता मान्यता दिल्याची माहितीही आ. अभिमन्यू पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन