
संजय हुलगे
माळशिरस/ तालुका प्रतिनिधी:
५ सप्टेंबर ,शिक्षक दिन! डाँ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस! विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार देऊन त्यांचा बौद्धिक, मानसिक, शैक्षणिक विकास करून देशाला सुसंस्कृत सुज्ञ नागरिक घडवून देणारा एक ज्ञानस्त्रोत म्हणजे शिक्षक! याच शिक्षकांचे,त्यांच्या कार्याचे, कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्याचा दिवस! सर्वच स्तरांवर शिक्षक दिन वेगवेगळ्या कल्पकतेने साजरा केला जातो.तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग माळशिरस व डायट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण तालुक्यातील सर्व केंद्रातील सर्व शिक्षकांना एकत्रित करून साजरा करण्यात आला. प्रत्येक आँनलाइन मिटींगसाठी पाच सहा केंद्र एकत्रित करून वेगवेगळ्या वेळी आँनलाइन वेबीनार घेऊन कार्यवाही करण्यात आली.राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षण तज्ञ,उत्कृष्ट लेखक हेरंब कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख ,विस्तार अधिकारी महालिंग नकाते , सोलापूर डायट जेष्ठ अधिव्याख्याता चंद्रकांत नरळे , यशवंतनगर व कन्या माळशिरस केंद्राचे केंद्र प्रमुख सुधीर नाचणे ,संगम केंद्राचे केंद्र प्रमुख हर्षवर्धन नाचणे , अकलूज केंद्राचे प्रभारी केंद्र प्रमुख राजेंद्र जाधव , आनंद नगर केंद्राचे प्रभारी केंद्र प्रमुख संतोष कोले व केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक हा महत्त्वाचा वाटा उचलत असल्याने शिक्षकाने स्वतः प्रयोगशील असणे ,आपले ज्ञान सतत वृधिंगत करणे गरजेचे आहे. वाचनाने माणूस आपले व्यक्तीमत्व विकसित करु शकतो. म्हणून शिक्षकांनी नियमितपणे वाचन करावे.किमान दिवसात पंन्नास पाने तरी वाचावीत, असा अनमोल सल्ला शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी सरांनी सर्वांना दिला.
सोलापूर डायट अधिव्याख्याता चंद्रकांत नरळे यांनी शाळा बंद असल्या तरी आँनलाइन शिक्षण व आँफलाईन पीडीएफ उपक्रम राबविणारे व स्वतः चा जीव धोक्यात घालून कोवीड १९ सर्वेक्षण करणारे शिक्षक म्हणजे आमचे कोरोना फायटर आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने ते काम करत आहेत,असे गौरोद्गार काढून सर्वाना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेबांनी ही सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व तालुक्यात होत असलेल्या शैक्षणिक कामाचे व सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचे कौतुक केले.तसेच नियमितपणे वाचन करण्यासाठी शिक्षकांना आवाहन केले.
शिक्षणविस्तार अधिकारी महालिंग नकाते साहेबांनीही सर्व शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.सुधीर नाचणे यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आपले मार्गदर्शन चालूच ठेवले.हर्षवर्धन नाचणे , राजेंद्र जाधव, संतोष कोले यांनी आपापल्या केंद्रातील आँनलाइन शिक्षणाचा आढावा घेतला व उत्स्फूर्त सहभागाची माहिती दिली. यात अकलूज, संगम,महाळूंग नेवरे,यशवंतनगर व आनंद नगर केंद्राचे केंद्र प्रमुख व सहा केंद्रातील मिळून जवळजवळ २५० शिक्षक सहभागी झाले होते.राजेंद्र जाधव यांनी शेवटी आभार मानले. नियमितपणे कमीत कमी पन्नास पानांचे वाचन करण्याचा संकल्प करून या सोहळ्याची सांगता झाली.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश