
मुख्तार मणियार/औसा,प्रतिनिधी:
औसा विधानसभा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांनी दिनांक 2 ते 3 सप्टेंबर रोजी मतदार संघातील हसुरी, सांगवी, उस्तुरी ,हिप्परसोगा सारोळा आदि गावातील सोयाबीन व इतर खरीप पिकाची पाहणी केली. सोयाबीन पिकावर चक्री भुंगा, खोड अळी व करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने याबाबत अभिमन्यू पवार यांनी तातडीने औशात आढावा बैठक घेऊन मतदारसंघातील पीक परिस्थितीचा संपूर्ण आढावा कृषी सहायकांच्या माध्यमातून घेतला.
सोयाबीन नुकसानीचे पंचनामे करून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तसेच पीक विमा नुकसानीच्या नियमानुसार 25% आगाऊ देणेबाबत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली. सोयाबीन वाढ होऊनही शेंगा कमी लागल्या.तसेच अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेंगा लागल्या असताना पावसाच्या खंडामुळे शेंगा भरल्या नाही.त्यामुळे उत्पन्नात पन्नास टक्केपेक्षा अधिक घट आज रोजी दिसून येत आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीनचा प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजना खरीप 2020 ते 2021 अंतर्गत हप्ता भरला आहे. विमा शासन आदेशानुसार अपेक्षित उत्पन्नात 50 टक्केपेक्षा जास्तीची घट दिसून येत असल्याने हे गावातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे या तरतुदीनुसार सोयाबीनचा अधिसूचित पिकासाठी संभाव्य पिकनिहाय नुकसान भरपाई नुकसानीचा 25% आगाऊ रक्कम देणेबाबत जोखीम तरतूद आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कीड-रोग व यावरील खंड यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या ३३% रकमेपेक्षा जास्त नुकसान झाल्यास पंचनामे करून मदत देण्याची तरतूद केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापन आदेशात समाविष्ट आहे.वरील दोन्ही आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा समाविष्ट आहे.वरील दोन्ही आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत सोयाबीन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमाच्या आगाऊ रक्कम मंजूर करण्याबाबत तसेच नैसर्गिक आपत्तीनुसार भरपाई देण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा