
मुख्तार मणियार/औसा,प्रतिनिधी:
औसा तालुक्यातील बेलकुंड व परिसरात यंदा मृगात पाऊस झाल्याने खरिपाच्या वेळेवर पेरण्या झाल्या. दरम्यान पिकापुरता पाऊस झाल्याने पिकेही बहरली. काढण्याच्या अवस्थेत असताना सतत रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे नुकसान झाले. तर सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाला.त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी केली. सध्या सोयाबीनला पाण्याची आवश्यकता आहे.परंतु पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सोयाबीनला शेंगा लागल्या असून त्या भरण्याच्या अवस्थेत आहेत. पाऊस नसल्याने शेंगावर परिणाम होत आहे.दरम्यान या भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने नदी,नाले,ओढे वाहिले नाहीत.त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. यंदा पिकापुरता पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके बहरली आहेत. सध्या सोयाबीनला पाण्याची गरज आहे. परंतु पाऊस नसल्याने हे पीक कोमेजू लागले आहे. त्यामुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा