गोमेवाडीचे साहित्यिक सुनील दबडे यांची २ सप्टेंबर रोजी FM रेडिओवर मुलाखत


आटपाडी/प्रतिनिधी:
खास माणदेशातील श्रोत्यांसाठी माणदेशातील गोमेवाडी ( ता.आटपाडी ) गावचे सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.सुनील दबडे यांची माणदेशी तरंग वाहिनीवर ( FM रेडिओवर ) बुधवार दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ .०० वाजता मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत Live असणार आहे. ही मुलाखत फोन ईन कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट गोमेवाडीतूनच दिली जाणार आहे.
गेल्या ०४ महिन्यांच्या कालावधीत प्रा.दबडे यांचे विविध मराठी दूरदर्शन चॅनेलवर कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. तसेच FM रेडिओवर ०३ कार्यक्रम झाले आहेत .छत्तीसगड सोना चांदी गलाई असोसिएशन मार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्याख्यानाचा कार्यक्रमही झाला आहे. जीवनगाणे गातच रहावे हा सुमारे दिड तासाचा व्याख्यानाचा कार्यक्रम सध्या ठिकठिकाणी सुरू आहे.